सोमवारच्या बंद मध्ये काँग्रेसही सामील होणार
ठाणे , प्रतिनिधी  :  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणा-या  शेतक-र्याना भाजपाच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून सोमवार दि.11 ऑक्टोबर ला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे महाराष्ट्रातील काॅग्रेस पदाधिकारी व काॅग्रेस कार्यकर्तेही या बंद मध्ये सामील होणार असल्याची माहिती आज ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.


          ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत ठाणे शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण,ठाणे काँग्रेस सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे,ठाणे काँग्रेसचे जेष्ठ उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक,काॅग्रेस प्रवक्ते रमेश इंदिसे आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते या वेळी बोलताना अॅड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,लखीमपूर खिरी येथील घडविण्यात आलेली घटना खूपच धक्कादायक असून या दुर्दैवी घटना एका भा.ज.पा.मंत्र्यांच्या पुत्राचा सहभाग असने हे त्याहून गंभीर आहे,.          भारतीय जनता पक्षाकडून घडविण्यात आलेले हे कृत्य हिटलर आणि मुसोनिनीलाही लाजवेल असे असून अशा प्रकारची घटना जनरल डायरने केलेल्या हत्याकांडाची आठवन करून देत असून या प्रकरणात विरोधात आवाज उचविणा-या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी यांना तुरूंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय भा.ज.पा.सरकारने दिला असून अशा क्रूर आणि अत्याचारी सरकारचा निषेध करीत असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे.           त्याच काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले,सर्व आस्थापना व व्यापारी बाधवांनाही आम्ही विनम्र आवाहन करतो की,या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होऊन देशहिताकरिता आपले कर्तव्य पार पाडावे असेही अॅड.विक्रांत चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments