प्रभागातील प्रलंबित कामे त्वरित सुरू करण्यासाठी रामबाग परिसरातील नागरिकांचे साखळी उपोषण
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिसरातील प्रभाग क्रमांक २७ मधील विविध मागण्या घेत वारंवार पालिकेला तक्रारी करून पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने तिरंगा जागृती विचार मंच व स्थानिक महिला व पुरुष वर्गाने पालिकेच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे.या उपोषणामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक २७  मधील एव्हरेस्ट नगर सोसायटी मधील पावसाच्या पाण्याचा निचरा, चिकणघर गावठाण मधील महापालिकेच्या काँक्रीट रस्त्यावर रबरी पद्धतीचे गतिरोधक (स्पिडब्रेकर) बसविणे. अंबिका सोसायटी मागील महापालिकेची बंदिस्त गटार साफ करणे. बी. जे. पार्क बिल्डींग ते कनकावती बिल्डींग पर्यंत पाणी वाहुन नेणारे मातीने भरलेले पाईप काढून या ठिकाणी भुयारी गटारी बांधणे. श्रमसाफल्य चाळ ते सज्जनवाडी पर्यंत होणाऱ्या काँक्रीट रस्त्यामधुन अमृत योजने अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे. एव्हरेस्टर नगरसम्राट नगरहिनापार्क बिल्डींग येथील ट्रान्सफॉर्मरची गटार नव्याने बांधुन बंदिस्त करणे.अशा प्रकारच्या १२ वविध मागणीसाठी अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून ही महानगरपालिका लक्ष देत नसल्याने महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी व परिसरातील काम लवकर करून घेण्यासाठी तिरंगा जागृती  विचार मंचचे अध्यक्ष चेतन म्हामुणकर व स्थानिक महिला व पुरुष वर्गाने पालिकेच्या विरोधात कल्याण रामबाग येथील जीवनसंध्या सोसायटी परिसरात रस्त्यावर बसून साखळी उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान पालिका प्रशासन जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचे चेतन म्हामुणकर यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments