पेट्रोल पंपावर अचानक आग लागली...

 

 डोंबिवली (  शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील राजूनगर येथील पेट्रोल पंपावर अचानक आग लागण्याची घटना शनिवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.सुदैवाने हा आगीत जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.डोंबिवली पूर्वेकडील अग्निशामक केंद्राला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमक दलाचा बंब घेऊन जवान घटनास्थळी पोहोचले.           अग्निशमक केंद्र डोंबिवली पश्चिम उपस्थानक अधिकारी जीवन बोऱ्हाडे यांसह जवानांनी सदर ठिकाणी आग काही क्षणाच विझवली.मिळालेल्या माहितीनुसार, राजू नगर येथील पेट्रोलपंप येथे एचपी पेट्रोल गाडी नं.एमएच ४३ इ ९३१८ या गाडीतून एम पी पेट्रोलचे सॅम्पल काढून ते बकेट मध्ये ठेवताना अचानक बकेटमधील पेट्रोलला आग लागली.घटना घडल्यावर काही वेळ बंद ठेवण्यात आला होता.   

Post a Comment

0 Comments