भिवंडी महानगरपालिकेत महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी साजरी


■गांधी जयंती निमित्ताने विशेष करोना लसीकरण, आरोग्य कर्मचारी यांचा   " सफाई मित्र अमृत सन्मान " प्रमाणपत्र देऊन केला सत्कार..भिवंडी दि 2 (प्रतिनिधी ) महापालिकेत गांधी जयंती निमित्ताने मुख्यालयात उपमहापौर इमरान वली मोहम्मद खान व महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड, मुख्यालयाचे उपायुक्त दीपक पुजारी, आरोग्य विभागाच्या  सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी, अशोक संखे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रभाग अधिकारी दिलीप खाने, फैजल तातली , इत्यादी अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.         गांधी जयंती निमित्त महापालिकेत मुख्यालयात आरोग्य कर्मचारी यांचेकारीता विशेष कोरोना  लसीकरण घेण्यात आली तसेच शिक्षक , व शिक्षकेतर कर्मचारी  यांचेकरीता विशेष कोरोना लसीकरण कार्यक्रम  प्रभाग समिती क्रमांक 5 च्या आवारात करण्यात आले होते. त्याच बरोबर  आजादीं का अमृत महोत्सव या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांचा सफाई मित्र अमृत सन्मान  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 
           यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सर्व कर्मचारी यांना आपण कर्मचारी म्हणून जरी कार्यरत असलो तरी आपण या शहराच्या आरोग्याची काळजी घेत आहोत त्यामुळे त्यामुळे आपण आपल्या कामाबाबत कोठेही कमी नाहीत, आपण सर्व सफाई मित्र आहोत, स्वच्छ्ता ही सेवा आहे याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगणे आवश्यक आहे. 
           पालिकेच्या सर्व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे काम करून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुरस्कार मिळवणे करता प्रयत्न करणे आवश्यक आहे.  त्यानंतर मंडई येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास उपमहापौर इम्रान वली मोह खान यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments