९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक 


डोंबिवली ( शंकर जाधव )   वासनेने आंधळ्या झालेल्या बापाने आपल्या ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या  घटनेची तक्रार  पीडितेच्या आईनेच पोलिसांत  दाखल केली आहे. सुरुवातीच्या काळात समाजाच्या भीतीने आणि सार्वजनिक शरमेने आई गप्प राहिली. मात्र वडिलांचा अत्याचार वाढू लागल्याने तिने शुक्रवारी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर नराधम वडिलांना अटक करण्यात आली.


            ४९  वर्षीय नराधम बापाने पत्नीच्या गैरहजेरीत ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केला. पहिली घटना ९ ऑक्टोबर आणि दुसरी घटना २६ ऑक्टोबरची असल्याची माहिती आहे. त्यावेळी पीडितेची आई तिच्या गावी कणकवली गेली होती. याच दरम्यान कधी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तर कधी रात्री झोपत असताना मद्यधुंद बापाने आपल्या ९ वर्षीय अल्पवयीन चिमुरडीला वासनेची शिकार बनवले.              आईने केलेल्या तक्रारीनुसार ९ वर्षांची अल्पवयीन मुलगी रडायची. शेवटी वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रार नोंदवल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments