२७गावांतील दस्तनोंदणी सुरु करण्यासाठी नाना पटोलेंची महसूल मंत्र्यांना शिफारस नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली होती पटोलेंची भेट
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांची दस्त नोंदणी गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. एकीकडे कोरोनाची महामारी तर दुसरीकडे मंदी त्यामुळे सध्या येथील बांधकाम व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सोमवारी केडीएमसी नगरसेवक कुणाल पाटील यांनी काँग्रसेचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. या नंतर पटोले यांनी तातडीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना २७ गावांच्या दस्तनोंदणी सुरु करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे शिफारस पत्र पाठवले आहे. त्यामुळे लवकरच २७ गावांच्या दस्तनोंदणीला सुरवात होण्याची शक्यता आहे.


कल्याण-डोंबिवली मधील २७ गावांमध्ये इमारती तयार आहेत. मात्र शासनाने या गावांमधील दस्त नोंदणी  बंद केली असल्याने हजारो घरांची विक्री रखडली आहे. त्यामुळे एन सणासुदीच्या काळात स्थानिक भूमिपुत्र विकासक हे नाराज आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी भूमीपुत्रांसाठी पुढाकार घेतला आहे. दस्त नोंदणी सुरु नोंदणी  करण्यासाठी विधानसभेचे मा. सभापती व राज्याचे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आहे. पटोले यांनी देखील तातडीने या प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्र्यांना पत्र लिहून दस्त नोंदणी सुरु करण्याची शिफारस केली आहे.गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या दस्त नोंदणीमुळे राज्य शासनाला मिळणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल देखील बंद आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दस्त नोंदणी सुरु झाल्यास भूमिपुत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments