एसएसटी महाविद्यालया तर्फे मुख्याध्यापकांचा अनसंग कोरोना वारीअर्स म्हणून सन्मान

  



कल्याण , प्रतिनिधी  : कोरोना महामारीच्या काळात अनेक कोरोना योद्ध्यांनी आपले योगदान देउन महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली. यात डॉक्टर्सनर्सेसपोलीससफाई कर्मचारी यांनी तर योगदान दिलेले आहेच त्यासोबतच शिक्षणाची ज्ञान गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांच्या साहाय्याने केले. या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यासाठी एस एस टी कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे हे होते. त्यांच्या हस्ते उल्हासनगरकल्याण ,डोंबिवली परिसरातील १०० पेक्षा जास्त शाळांच्या मुख्याध्यापकांचा त्यांचे नाव व फोटो असलेलं सन्मान चिन्ह देउन सत्कार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात अंबरनाथउल्हासनगरबदलापूर आणि वांगणी या परिसरातील मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एसएसटी कॉलेजचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य  डॉ.पुरस्वानी, तसेच जीआरसी हिंदी हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश शुक्ला हे उपस्थित होते.



ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले तसेच मुख्याध्यापकांनी कोरोनाच्या काळात केलेल्या शैक्षणिक कामाचे कौतुकही केले. सत्कार केलेल्या मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की असा कार्यक्रम मुख्याध्यापक किंवा शिक्षकांसाठी आजपर्यंत कुणीही केला नाहीएस.एस.टी महाविद्यालयाने सत्कार केला म्हणून महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राजीवन विचारे, डॉ. खुशबू पुरस्वानी, सर्व प्राध्यापकस्वयं सेवक यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments