आंबिवली तील आरक्षित भुखंडा वरील कबड्डी मैदानावर दसार्याच्या शुभ मुहूर्ता वर रगंला कबड्डीचा थरार

                                                                            कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपाच्या सौजन्याने लोकसहभागातून अवघ्या दहा दिवसांत कबड्डीची दोन क्रिडांगणे साकरत दसाराच्या दिवशी आंबिवलीतील अरक्षित भुखंडावर कबड्डीचा थरार रंगल्याने खेळाडूसह कबड्डी शौकीनांचा आनंद द्विगुणित झाला.           कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दसाराच्या आधी आंबिवली येथील स्वराज्य गुहसंकुला लगत असलेल्या मनपाच्या आरक्षित भुखंडावर वूक्षारोपण केले. त्या प्रसंगी त्यांनी ग्रामीण "अ" प्रभागातील कबड्डी पट्टूचे  गत वैभव पुनश्च प्राप्त होण्यासाठी कबड्डीची नामशेष होत असलेली मैदानाची संख्या पाहता कबड्डीचे मैदान होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून आजच्या तरूणाईला व्यायामासह मैदानी खेळाची गोडी निर्माण होईल आणि उत्कृष्ट कबड्डी खेळाडू तयार होतील. या दुष्टीकोनातुन  अ प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांना कबड्डीची क्रिंडागणे येत्या दहा दिवसांत तयार करण्याबाबत सुचना केल्या.अ प्रभागक्षेत्र राजेश सावंत यांनी  माजी राज्य कबड्डी पट्टू प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधत लोकसहभागातून कुठलाही निधी न वापरता दोन भव्य अशी कबड्डीची क्रिंडागणे साकरली आणि दसर्याच्या शुभमुहूर्तावर या मैदानावर माहिलापुरुष गटाचे कबड्डी सामान्याचा खेळाचे उद्घाटन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. सहभागी झालेल्या जयदुर्गा क्रिडा मंडळ अब गट अटाळीअजिंक्य क्रिडा मंडळ आंबिवलीसंघर्ष मित्र मंडळ  या  संघातील खेळाडूनी आपल्या चढाई मधुन खेळाचे कसब दाखवित उपस्थितांना कबड्डी खेळाचा थरार अनुभव दिला.या चुरशीच्या कबड्डी सामान्यात जयदुर्गा क्रिडा मंडळ यांनी विजेते पदाचा चषक प्राप्त केला. तर उपविजेता संघ संघर्ष मित्र म़ंडळ ठरला माहिला कबड्डी संघाच्या सामान्यात  संघर्ष क्रिडा संस्था संघावर मात करीत  ज्ञान शक्ति युवा संस्था कल्याण यांनी बाजी मारीत चषक पटकविला. स्थानिक कबड्डी चे होतकरु खेळाडू नी याप्रसंगी प्रशासनाने कबड्डी मैदान साकरल्याबाबत धन्यवाद मानले.   


                         

"आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येत्या काही दिवसात या मैदानाला लाईट आणि पाणी सुविधा उपलब्ध करणार असल्याचे सागंतकोल्हापूर येथे आपण काम करीत असताना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून कबड्डी खेळाडू साठी सुविधा दिल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्या कबड्डी खेळाच्या कसबाचे उत्कृष्ट प्रर्दशन करीत मैदाने गाजविली आज त्या कबड्डी खेळामुळे रेल्वे आणि एअर इंडिया नोकरी करण्याची संधी मिळाली. अशी संधी आपल्या क्षेत्रातील कबड्डी खेळाडू ना त्यांच्या खेळामुळे प्राप्त होऊ शकतात."         प्रशासकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयुक्तांनी आरक्षित भुखंडाची सद्य स्थितीत माहिती सादर करण्याचे सांगितले असुन किमान शंभर आरक्षित भुखंडावर उपलब्धतेनुसार कबड्डीखो खो,व्हाँली बाँल्क्रिकेट आदि खेळाची मैदाने कशी साकरता येतील अमंलबजावणी करण्यास सांगितले असल्याने आगमी काळात खेळाडूना आपल्या नजीक मैदाने उपलब्ध होतील असे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

Post a Comment

0 Comments