केडीएमसीच्या वर्धापन दिना निमित्त सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ३८ वा वर्धापन दिन शुक्रवारी १ ऑक्टोंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील नियोजित सिटी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त आणि पालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.(एसकेडीसीएल) आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडे सहा वाजता गंधारी ब्रिज ते नविन रिंग गंधारी ब्रिज  धावणे व चालणे, सात वाजता गांधारी ब्रिज डाव्या बाजूने आधारवाडी चौक ते गांधारी ब्रीज सायकल चालवणे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला चागंला प्रतिसाद लाभला. तर अकरा वाजता गौरीपाडा सिटी पार्क येथे शहारातील प्रादुषण मुक्तीच्या दुष्टीकोनातुन वृक्षारोपण करण्यात आले.एसकेडीसीएल मुख्य वित्त अधिकारी अशोक कुंभार कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प )तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता  भालचंद्र नेमाडे, उप अभियंता (विशेष प्रकल्प) सुरेंद्र टेंगळेएसकेडीसीएल माहिती व तंत्रज्ञान व्यस्थापक घनश्याम भाबडसहायक व्यस्थापक प्रणोती शिंदे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीचे अधिकारी,  प्रकल्प सल्लागार आणि सामान्य नागरिकांनी देखील सहभाग  घेतला.या आधी देखील पर्यावरण दिनाच्या दिवशी  सिटी पार्क मध्ये झाडे लावली असून आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रदुषणापासून मुक्ती हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून झाडे लावण्यात आली आहेत. सिटी गार्डन मध्ये सुमारे १३०० झाडे लावण्यात येणार असून त्यांची जोपसना करून हा परिसर हिरावाई करणार असल्याचे तरूण जुनेजा यांनी सांगितले.   

Post a Comment

0 Comments