टीसीएलचा नाशिकमध्ये विस्तार


■टीसीएलद्वारा निर्मित भारताचा पहिला मिनी एलईडी आता नाशिकमध्ये उपलब्ध ~


मुंबई, २४ ऑक्टोबर २०२१  :  टीव्ही सेग्मेंटमध्ये तांत्रिक प्रगती करत, जागतिक स्तराच्या टीसीएल या कंपनीने भारताचा पहिला मिनी एलईडी नाशिकच्या ऑफलाइन मार्केटमध्ये लॉन्च करत असल्याचे जाहीर केले आहे. हा मिनी एलईडी टीव्ही बर्‍याच काळापासून चर्चेत होता. आणि आता नाशिककरांसाठी ही खुशखबर आहे की, ते प्रत्यक्ष दुकानात जाऊन या अद्भुत मनोरंजनाचा अनुभव घेऊ शकतात. टीसीएल सी८२५ मिनी एलईडी ४के क्यूएलईडी टीव्ही ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन साइझमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे १,१४,९९० रु आणि १.४९.९९० रु. आहे. क्वांटम डॉट टेक्नॉलॉजी असलेला हा मिनी एलईडी होम एन्टरटेन्मेंटच्या यूझर फ्रेंडली, इंटरअॅक्टिव्ह अनुभवाची हमी देतो.       टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, “मिनी एलईडीचे लॉन्चिंग म्हणजे निरंतर इनोव्हेशन करून नव्या पिढीच्या यूझर्सना आधुनिक टेक्नॉलॉजीच्या बाबतीत उत्कृष्टता प्रदान करण्याच्या टीसीएलच्या वचनबद्धतेचो पुष्टी आहे. सुरुवातीपासूनच या ब्रॅंडने विशिष्ट बाजारांवर फोकस केले आहे. आणि नाशिक मध्ये आता मिनी एलईडी उपलब्ध झाल्याने आमच्या संभाव्य ग्राहकांना अद्भुत मनोरंजनाचा अनुभव प्रत्यक्ष घेता येऊ शकेल. एक ब्रॅंड म्हणून आमच्या या नवीन ऑफरिंगसह, आमच्या ग्राहकांना त्यांची स्मार्ट टीव्हीची कल्पना नव्याने परिभाषित करण्याचे वचन आम्ही देतो. नाशिक मधील या ऑफलाइन लॉन्चमुळे ऑफलाइन मार्केटमधील या ब्रॅंडचा दबदबा आणखी वाढेल.”       टीसीएल मिनी एलईडी ४के क्यूएलईडी टीव्ही फीचर्स:

या उत्पादनाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात करण्यात आलेला मिनी एलईडी टेक्नॉलॉजीचा उपयोग, ज्याच्यामुळे त्यात अधिक व्यापक रंग-पट परफॉर्मन्स आणि हाय कॉन्ट्रास्ट रेशो आणि एचडीआर आहे. लोकल डिमिंग द्वारा देखील तो समर्थित असल्याने प्रेक्षकांना आकर्षक व्ह्यूईंग अनुभव देतो. मिनी एलईडीज  उपयोगामुळे हे उत्पादन बारीक आणि वजनात हलके आहे.        याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, मॅजिकनेक्ट, जे यूझर्सना त्यांचा टीव्ही त्यांच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यास सक्षम करते, ज्यामुळे अनेक टास्क आरामात करता येतात. यूझर्स आता लाईव्ह टीव्हीचा स्क्रीन शॉट घेऊ शकतील, सोशल मीडिया मार्फत कंटेंट शेअर करू शकतील, ऑडिओ आणि व्हिडिओ कास्ट करू शकतील आणि असे इतरही टास्क करू शकतील.         या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन आयक्यू आहे, जे या टीव्हीला प्रत्येक क्षणी अत्यंत सुंदर पिक्चर देण्यास सक्षम करते. याशिवाय या टीव्हीमध्ये १२०Hz एमईएमसी आणि टीसीएलचे खास अल्गोरिदम आहे, ज्याच्यामुळे अॅक्शन-पॅक्ड कंटेंट देखील कोणत्याही त्रुटी शिवाय पाहता येतात. समर्पित २.१ पोर्टसह गेम मास्टर हा या टीव्हीचा गेमर्ससाठी असलेला अतिरिक्त लाभ आहे. या वैशिष्ट्यामुळे गेमर्स हाय-क्वालिटी गेम्सदेखील सहज प्रॉसेसिंग आणि दमदार ऑप्टिमायझेशनसह खेळू शकतात.             या सर्व वैशिष्ट्यांमध्ये भर म्हणून मॅग्नेटिक कॅमेरा आहे, जो आता तुम्हाला गूगल ड्युओ अॅप मार्फत व्हिडिओ कॉल करण्यास किंवा घेण्यास सक्षम करतो. शिवाय, या उपकरणात आयमॅक्स इन्हान्सेस सर्टिफिकेशन, डॉल्बी अॅटमॉससह ऑनक्यो साऊंडबार आणि बिल्ट-इन सब-वूफर आहे, जे ग्राहकांना घरातच थिएटरसारखा अनुभव मिळेल हे सुनिश्चित करतात. टीसीएल स्मार्ट युआय हे सुनिश्चित करते की, तुम्ही आपल्या टीव्हीमार्फत तुमची सर्व स्मार्ट उपकरणे सहजपणे आणि आरामात नियंत्रित करू शकता.

Post a Comment

0 Comments