राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेतील सुवर्ण व रौप्यपदक विजेत्यांचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कडून कौतुकाची थाप
डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली येथील १० खेळाडूंनी उदयपूर, राजस्थान येथे १९ ते २१ सप्टेंबर २०२१ या कालावधीत पार पडलेल्या  राष्ट्रीय जम्परोप स्पर्धा २०२०-२१ मध्ये प्रशिक्षक अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करून एकूण १३ सुवर्ण व ७ रौप्य पदके पटकावली. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने या खेळाडूंना बालभवन येथे सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.             या सर्व खेळाडू व त्यांच्या पालकांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.  यापुढेही असेच सहकार्य मिळावे अशी आशा व्यक्त केली. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी  मुलांना पदके मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.चौकट
 पदक विजेते खेळाडूंमध्ये भार्गवी पाटील (२ सुवर्ण), मनस्वी पाटील (२ सुवर्ण), श्रिया वाणी (२ सुवर्ण), तन्वी नेमाडे (२ सुवर्ण), भूमिका नेमाडे (१ सुवर्ण, १ रौप्य), मानस मुंगी (१ सुवर्ण, १ रौप्य), पद्माक्षी मोकाशी (१ सुवर्ण, १ रौप्य), पालवी समेळ (१ सुवर्ण, १ रौप्य), प्रेरणा सप्रे (१ सुवर्ण, १ रौप्य), ईशान पुथ्रन (२ रौप्य) आदी खेळाडूंचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments