Header AD

मध्य रेल्वेकडून कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मध्य रेल्वेच्या  मुंबई विभागात मोठे अपघात झाल्यास रेल्वे प्रशासनासह स्थानिक सुरक्षा यंत्रणा व राष्ट्रीय आपत्ती दलासह एनडीआरएफच्या पथकाने संयुक्त रित्या अपघाता समयी बचावकार्य कसे करावे यासाठी आज कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल केले.एखाद्या रेल्वेच्या जळत्या बोगीत अडकलेल्या प्रवाशांच्या कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार करण्यात आली. यासाठी  एनडीआरएफ,  रुग्णवाहिकाकल्याण डोंबिवली अग्निशमन दल सज्ज असल्याचे  रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला संदेश देण्यात आला. त्यांनतर एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले. यावेळी बोगीच्या वरून आणि खिडक्यांमधून भाग कापला गेला.  त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ  डब्यात घुसले. आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा वापर केला होता. तसेच  रेल्वे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. यावेळी रेल्वे संरक्षण दलानेही मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते. बोगीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने थरारक रित्या  मदत केली. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी बोगीत शिरून आग पूर्णपणे विझवली.       सर्व प्रवाशांना जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले आणि घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याचे मापदंड देखील तपासले. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत सर्व सुरक्षा यंत्रणा  जलद काम करीत असल्याचे दिसून आले. तासाभरात संपूर्ण आपत्ती  एजन्सींसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत पार पाडले.  मध्यरेल्वेच्या  मुंबई विभागाचे उद्दिष्ट शून्य अपघाताचे आहे.         तथापिअशी कोणतीही अनुचित घटना घडल्याससज्जता आणि जलद प्रतिसादासाठी या मॉकड्रिल  द्वारे संयुक्तपणे सुरू ठेवल्या जातील. या मॉकड्रिलची कल्पना  समन्वय मुंबई विभागाच्या सुरक्षा विभागाने रचली होती. यावेळी शशांक मेहरोत्रामुख्य वैद्यकीय अधीक्षककल्याण रेल्वे हॉस्पिटलचे  रॉबिन कालियावरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारीडॉ ए. के. सिंहवरिष्ठ जनसंपर्क अधिकारी आणि इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मध्य रेल्वेकडून कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल मध्य रेल्वेकडून कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल Reviewed by News1 Marathi on October 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads