डोंबिवली पश्चिमे कडील दफन भूमीचा वाद चिघळला... संतप्त नागरिकांचा पालिका पथकाला घेराव

   

 
डोंबिवली ( शंकर जाधव ) पश्चिम डोंबिवलीतील देवीचापाडा येथे असलेली हिंदूंची पारंपारिक दफनभूमी अन्य समाजाला देण्याचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घाट घातला आहे. केडीएमसीच्या या भूमिकेला स्थानिक रहिवाश्यांनी कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शेकडोंच्या संख्येने जमलेल्या रहिवाश्यांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पथकाला घेराव घतला. अखेर नागरिकांचा राग पाहून पथकाने पाहणी न करतातच परत जावे लागले.
        डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा परिसरात आरक्षण क्र. 309 C.G. या भूखंडावर असलेल्या दफनभूमीत गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदूंची वहिवाट आहे. 12-15 वयोगटातील मुलाचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहावर याच दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास या दफनभूमीची पाहणी करण्याकरिता केडीएमसीच्या मालमत्ता विभागाचे अधिकारी कमलाकर राऊत हे त्यांच्या लव्याजम्यासह तेथे आले. 
         जागेच्या पाहणीसह मोजमाप करण्यात येत असल्याचे कळताच शेकडोंच्या संख्येने रहिवाश्यांसह ग्रामस्थांनी या पथकाला गराडा घातला. पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईरगोरखनाथ म्हात्रेविजय भोईरअनिल भोईरकुणाल म्हात्रेसमीर भोईरविकी म्हात्रे आदींनी केडीएमसी अधिकारी कमलाकर राऊत यांनी जाब विचारला. सदर दफनभूमी महानगरपालिकेमार्फत अन्य समाजाला देण्याच्या उद्देशाने आम्ही पाहणी करण्यास आलो असल्याचे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सांगितले. 
          मात्र प्रशासनाच्या या भूमिकेला उपस्थित रहिवासी व ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. आम्हाला शांतता हवी आहे. कोणताही जातीयवाद प्रशासनाकडून करण्यात येऊ नयेअन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला केडीएमसी प्रशासन जबाबदार राहीलअसा इशारा उपस्थितांनी दिला. या संदर्भात देवीचापाडा ग्रामस्थ मंडळाने निवेदनही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले. 
      सदर दफनभूमी महानगरपालिकेमार्फत अन्य समाजाला देण्याचा उद्देश असेल तर तो आम्ही सफल होऊ देणार नाही. तरीही आपला उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास जातीय तेढ निर्माण होण्यास प्रशासन जबाबदार राहणार आहे. तसेच इच्छा नसताना देखील केडीएमसी विरोधात ग्रामस्थांना आंदोलन पुकारावे लागेल व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना पूर्णतः आपणच जबाबदार रहालअसाही इशारा देवीचापाडा ग्रामस्थ मंडळाने स्वाक्षऱ्यांच्या निवेदनात म्हटले आहे.        

          या संदर्भात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवत म्हणाल्यासर्व्हे करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार आमचे पथक सदर ठिकाणी गेले होते. आयुक्तांना तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. आयुक्त त्यावर निर्णय घेतीलअसेही उपायुक्त भागवत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments