बल्याणीतील रस्त्यातील खड्ड्यांबाबत भाजपाचे आयुक्तांना साकडे


■रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार सरफराज मुन्ना रईस यांनी उपस्थित केला सवाल....

 

कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ बल्याणी येथील रस्त्यातील खड्ड्यांबाबत भाजपाने आयुक्तांना साकडे घातले असून येथील रस्त्याचे डांबरीकरण कधी होणार असा सवाल भाजपा टिटवाळा मोहन मंडळ उपाध्यक्ष सरफराज मुन्ना रईस यांनी उपस्थित केला आहे.


बल्याणी प्रभागातील मुख्य रस्ता माताजी मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डोंगरवाली मैया मंदिर रोड या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून या रस्त्यांचे कधीही डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे आता झालेल्या पावसामुळे या रस्त्यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून रस्ता बनविण्यात आला नसल्यामुळे सदर रस्त्यावर डांबर देखील शिल्लक राहिलेले नाही. कल्याण ते टिटवाळा येण्या-जाण्यासाठी हा एकच रस्ता असल्याने तेथून खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परंतु हा रस्ता खराब असल्याकारणाने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अपघातांचे प्रमाण देखील वाढले असल्याचा आरोप भाजपा टिटवाळा मोहन मंडळ उपाध्यक्ष सरफराज मुन्ना रईस यांनी केले आहे.          याबाबत रईस यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर काम पूर्ण होणार असल्याचे तोंडी आश्वासन सरफराज मुन्ना रईस यांना आयुक्तांनी दिले आहे. परंतु बल्याणी  मार्गावरील  रस्ता लवकरात लवकर बनवला नाही तर अनेक नागरिकांचा जीव धोक्यात जाणार असल्याची स्पष्टोक्ती रईस यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments