महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती अभिवादन
डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रपुरुष स्मृती जागरण समिती व  भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली पूर्व मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त डोंबिवली पश्चिमेकडील  महात्मा गांधी उद्यानातील महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री शिल्पास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             राष्ट्रपुरुष स्मृती जागरण समितीचे विजयराव मुळे, अनिल सरदेसाई, मनीषा आचरेकर, सुरेश पुराणिक, गंगाधर पुरंदरे, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,प्रदीप चौधरीपांडुरंग म्हसकर, संजीव बीडवाडकर बाळा (प्रकाश) पवार, अमोल दामले, सुरेश जोशी, सुजीत महाजन, राजेश म्हात्रे, सुरेश नेमाडे, अनिरुद्ध कुलकर्णी, संदीप शर्मा, मिहीर देसाई, चिंतन देढीया,  महिला मोर्चाच्या वतीने  अग्रवाल, देवीकृष्णन मॅडम,मीना अहिरे, युवा मोर्चाच्या वतीने  मितेश पेणकर, सुप्रिया  कोलार, अथर्व कांबळे,सिद्धार्थ शिरोडकर, जास्मिन शहा, रुपेश पवार, महेश कोलार, केवल शहा, आकाश बागडी, मनीष शहा  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments