राज्यमंत्री व आमदार असूनही शहराचा काय विकास केला... शिवसेनेचे भाजप आमदारांना प्रतिउत्तर
डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्यमंत्री व आमदार असताना डोंबिवली शहराचा विकास काय केला असा सवाल उपस्थित करत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांना प्रतिउत्तर दिले.आमदार चव्हाण यांनी पालकमंत्र्यांनी केलेल्या आरोपावर शिवसेनेने दिलेल्या उत्तराने शिवसेना व भाजप यांच्यात आता आरोप –प्रत्यारोप सुरु झाल्याचे दिसते.

  


        डोंबिवली शहरातील उपरस्ते काँक्रीटीकरणसाठी आघाडी सरकार मागील  मंजूर निधी देत नाही. पालकमंत्री दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.यासंदर्भात शिवसेनाडोंबिवली शिवसेना शहरप्रमुख मोरे म्हणाले, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली तर प्रसिद्धी मिळेल असा भाजप आमदारांचा आशावाद आहे. त्यामुळे स्थानिक आमदार काहीही आरोप करतात हे चुकीचं आहे.  

          कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात ते गायब होते आणि स्वतः शिंदे साहेबांवर आरोप करतात आणि म्हणतात ४७२ कोटी देत नाहीत.डोंबिवली एमआयडीसी विभाग रस्त्यांसाठी ११० कोटी रुपये खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत.
        ग्रामीणसाठी ३६२ कोटी रुपये मिळाले आहेत. काही ठिकाणी १२  कोटीकाहि ठिकाणी २० कोटी रुपये निधी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रासाठी मिळाले आहेत. काही कामे सुरू झाली आहेतकाही वर्क ऑर्डर मिळाली आहेत तर ११० कोटी निधीच्या कामाचे प्रोसिजर सुरू आहेटेंडर काम चालू आहे. डोंबिवलीत कामेही सुरू होतील.
       डोंबिवलीचे आमदार चव्हाण अनेक वर्षे कार्यरत असूनही  आता ते गायब आहेत. कोरोनाचे मोठे संकट असतांना कुठेही दिसलेच नाहीत. पण त्यावेळीही त्यांचे म्हणणे होते कीएवढी कोविड सेंटर्स कशालाएवढे रुग्ण आहेत का 
       असा प्रश्नही आमदार चव्हाण यांनी उपस्थित केला होता.तर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यामुळे डोंबिवली जिमखानासावळाराम अशी अनेक कोविड सेंटर्स झाली.बारा वर्षात आमदार चव्हाण यांनी डोंबिवलीसाठी कोणता निधी खर्च केला ?   

          आज कोणी विचारात नाही म्हणून प्रसिद्धीसाठी केवळ टीका करीत आहेत. पालकमंत्र्यांवर  टीका केली तर प्रसिद्धी मिळते यासाठी काहीही आरोप होत आहे हे चुकीचं आहे. डोंबिवलीत काही विभागात पाणी समस्या त्रासदायक ठरत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
       `पाणी नाही तर मत नाही` असे नागरिक म्हणतात. यावर मोरे यांना विचारले असता ते म्हणाले नागरिकांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. लोकांना पाणी मिळाले पाहिजे. पण आता पाण्यासाठी कामे सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही काळातच पाण्याचा प्रश्न निकाली निघेलशिवसेना काम करीत आहे.

Post a Comment

0 Comments