‘एको’चा वित्त पुरवठा क्षेत्रात प्रवेश


■ एक अब्ज डॉलर्सच्या कर्जांद्वारे लघु तसेच मध्यम व्यवसायांच्या सबलीकरणाचे उद्दिष्ट ~


मुंबई, २० ऑक्टोबर २०२१ : विक्रेत्यांचे सक्षमीकरण करणारे भारतातील अग्रगण्य व्यासपीठ एकोने (Eko.in) आता वित्त पुरवठा क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. महत्त्वाकांक्षी विक्रेत्यांसाठी ‘फर्स्ट टाइम क्रेडिट’ मॉड्यूलची निर्मिती करण्यात आली आहे. भारतात निधी हस्तांतरणात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास आता झपाट्याने देशभरातील कोट्यवधी सूक्ष्म आणि लघुउद्योगांच्या सक्षमीकरणाकडे झेपावत आहे. उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या डिजिटल पदचिन्हांना बळकट केले जात आहे.         लवचिक परतफेड पायाभूत सुविधेसह जवळपास एक अब्ज डॉलर्सची कर्जे वितरित करण करण्यात आली आहेत. कंपनीने आता परवडण्याजोगे भांडवल आणि एआयचे पाठबळ असलेल्या सेवा एमएसएमईंना पुरवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यातून त्यांना त्यांच्या आस्थापनांत डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यात मदत होणार आहे. एकोला पूर्वनिश्चित उधारी मर्यादेत दैनंदिन ड्राडाऊन आणि दैनंदिन परतफेडीसह उत्पादने तयार करायची आहेत. लघु आणि मध्यम व्यावसायांच्या एकूण कारभारांना चालना देण्याचा कंपनीचा मानस आहे. तसेच क्रेडिटचा प्रवाह वाढवणे तसेच कर्ज वितरण व्यवसायात संकल्पनांच्या पूर्तीचेही उद्दिष्ट आहे.          एकोचे सहसंस्थापक श्रीयुत अभिषेक सिन्हा म्हणाले की, “भारतातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या वित्त पुरवठ्यात तब्बल ३८० अब्ज डॉलर्सची दरी असल्याचा अंदाज जागतिक बँकेच्या एका अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. देशाच्या विकासातील त्यांची मोलाची भूमिका पाहता एमएसएमईंना त्यांच्या खरी क्षमता गाठून देण्याच्या उद्देशाने त्यांच्या सक्षमीकरणासाठी काही ना काही करण्याची गरज आहे. सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आम्ही लघु उद्योगांसाठी एकछत्री व्यासपीठ उभारण्याचे ध्येय बाळगून आहोत. जे वित्त पुरवठ्याच्या विश्वात त्यांचे स्वागत करेल आणि त्यांच्या कारभार डिजिटली हाकण्यात मदत करेल. परिणामी या लघु उद्योगांचा आर्थिक ताळेबंद आणखी मजबूत होईल.”        हे फिनटेक व्यासपीठ आपल्या सेवांत ‘सूक्ष्म कर्ज धोरणा’चा वापर करून त्याच्या पूर्ततेसाठी उत्पादने तयार करते. त्याची दैनिक परतफेडीची पायाभूत रचना विक्रेत्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड दररोज पूर्णपणे व अंशत: रूपात करण्यात मदत करते. या कर्जाच्या माध्यमातून ते आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी उपयोग करू शकतात. तसेच ते एकोचे व्यासपीठ वापरून किंवा स्वतंत्रपणेही आपल्या ग्राहकांची संख्या वाढवू शकतात.           एकोच्या व्यासपीठावर करण्यात आलेले व्यवहार त्यांच्या मालकी हमीच्या मॉडेलवर चालतात. सिबिल स्कोअर नसलेल्या आणि औपचारिक कर्ज वितरण व्यवस्थेचा भाग नसलेल्या विक्रेत्यांनाही कर्ज पुरवठा करणे, हेही या व्यासपीठाचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. कार्यक्षम परिणाम दिसून यावे म्हणून हे प्रारूप विक्रेत्यांचा लोकसंख्याशास्त्रीय आणि व्यवहारांच्या डेटाचाही वापर करते.

Post a Comment

0 Comments