विद्यार्थी भारती संघटनेची तालिबानी सरकारच्या विरोधात मोहीम सुरू
कल्याण , कुणाल म्हात्रे  : अफगाणिस्तानात तालिबानी विचारांचा कब्जा दिवसेंदिवस अतिरेक माजवत असताना शेजारी राष्ट्र ज्या पद्धतीने चुप्पी साधून बसले आहेत ही प्रचंड खेदाची बाब असून तालिबान सरकारची पाठ थोपटणीच म्हणावी लागेल अश्यात तेथील महिलांचे शिक्षण बंद करून त्यांच्या नोकऱ्या त्यांचं खेळणं सगळं काही बंद करून बुरखा हेच त्यांचं जग व चूल आणि मुलं हेच त्यांचे अस्तित्व इतकं मर्यादित करण्याची मजल तालिबान सरकारची वाढली असून याचा मोठ्या प्रमाणात निषेध झाला नाही तर हीच परिस्थिती जवळपासच्या देशात लवकरच पाहायला वेळ लागणार नाही असे मत विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी व्यक्त केले.       तसेच  विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शाळा कॉलेजांमध्ये वस्त्यांमध्ये  जाऊन  अफगान मधील या परिस्थिती बद्दल तरुणांसोबत चर्चा करून या निरर्थक निर्बंधांच्या विरोधात निषेध नोंदवत. #I_am_with_afgan_girl ही मोहीम सुरू केली असल्याची माहिती विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी दिली.       शिक्षण हाच उद्याच्या भविष्याचा मूळ पाया आहे. जर स्त्री शिकली तरच ती नोकरी करू शकेलकिंवा एखाद्या क्रूर प्रथेच्या विरोधात उभी राहू शकेल मैदानात खेळू शकेलपदाधिकारी होऊ शकेल. पण जर ती शिकलीच नाही तर ती तिच्या मर्यादित आयुष्यात गुलाम बनून जगेल म्हणून शिक्षण हा मूळ पायाच तोडण्याचा डाव या तालिबान सरकारने आखला आहे. असे विद्यार्थी भारती राष्ट्रीय सचिव प्रणय घरत यांनी सांगितले. या मोहिमेला मोठ्या प्रमाणात मुंबईतील तरुणांनी पाठिंबा दिला असून देशातील तमाम विद्यार्थ्यांनी या लढ्यात सामील व्हावे असे आव्हान विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे विद्यार्थी भारती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments