विठ्ठलवाडी, घाटकोपर आणि नायगांव येथे आयोजित ३ रक्तदान शिबिरांमध्ये ३०९ निरंकारी भक्तांचे रक्तदान
कल्याण, कुणाल  म्हात्रे  संत निरंकारी मिशनची समाज कल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी विठ्ठलवाडीघाटकोपरआणि पश्चिम उपनगर नायगांव अशा तीन ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये एकंदर ३०९ निरंकारी भक्तांनी उत्साहपूर्ण रक्तदान केले.            सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण अंगीकारत निरंकारी भक्तगण रक्तदानाबरोबरच विभिन्न सामाजिक सेवांमध्ये सदोदित आपले योगदान देत आहेत.  निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी १९८६ मध्ये स्वत: रक्तदान करुन सुरु केलेल्या या रक्तदान अभियाना अंतर्गत आतापर्यंत संत निरंकारी मिशनकडून ११ लाखांहून अधिक रक्तदान करण्यात आले असून देशासह विश्वातील सर्वाधिक रक्तदान करणारी संस्था होण्याचा मान मिशनला मिळालेला आहे.          विट्ठलवाडीच्या रक्तदान शिबिरात १०७ युनिट रक्त संकलित करण्यात आले. ज्याचे संकलन संत निरंकारी रक्तपेढी द्वारे करण्यात आले.  या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे डोंबिवली झोनचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, सेक्टर संयोजक किशन नेनवानी व मंडळाचे स्थानिक प्रबंधक परमानंद विश्वकर्मा तसेच सेवादल संचालक बारकू पावशे आदि उपस्थित होते. आमदार गणपत गायकवाड यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. त्यांनी शिबिराचे अवलोकन करत असताना मिशनच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली.            घाटकोपर विभागातील असल्फा मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या श्री महेश्वर मंदिर सभागृहामध्ये आयोजित रक्तदान शिबिरात १५६ युनिट रक्त एकत्रित करण्यात आले. ज्याचे संकलन संत निरंकारी रक्तपेढीकडून करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक किरण लांडगे आणि संत निरंकारी मंडळाचे घाटकोपर सेक्टरचे सह संयोजक प्रकाश जोशी यांनी संयुक्तरित्या केले. आमदार दिलीप लांडे आणि माजी नगरसेविका अश्विनी मते यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. सर्व गणमान्य व्यक्तींनी संत निरंकिारी मिशनच्या मानवसेवेच्या कार्यांचे कौतुक केले.             पश्चिम उपनगरांमध्ये पालघर जिल्ह्यातील नायगांव येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ४६ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. ज्याचे संकलन नायर हॉस्पिटलमुंबई यांच्याकडून करण्यात आले.  या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे नाशिक झोनचे क्षेत्रीय प्रभारी जनार्दन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments