उत्सव तर रद्दच, दर्शनासाठी लागणार दोन डोस दुर्गाडी किल्ल्या वरील दुर्गा मंदिरात नवरात्रीचा उत्साह
कल्याण : कल्याण शहरातील नावरात्रीतील सर्वात मोठा उत्सव दुर्गाडी किल्यावर साजरा होतो. मात्र गेल्या वर्षी कोरोंनाचे सावट असल्याने उत्सव रद्द करण्यात आला होता. यंदाही उत्सव रद्द करण्यात आला आहे.
            दुर्गाडी किल्यावरील मंदिरात आणि परिसरात कोरोंना नियमांचे पालन करण्यात येईल. तसेच लासिकरणाचे दोन डोस झाले असेल तरच भाविकांना दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा देवीचे दर्शन मिळू शकेल अशी माहिती आमदार तथा शिवसेना कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली.    
कल्याण शहर ही एतिहासिक शहर असल्याने या ठिकाणी २०० ते २५० वर्षे जुनी मंदिरे आहेत. त्यातच देवींची देखील मंदिरे आहेत. नवरात्री उत्सवात या मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा केला जातो. यंदा मंदिरे उघडली असली तरी लसीचे दोन डोस झाले असतील तरच मंदिरात प्रवेश मिळणार असालयाचे शासन नियमात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर कल्याणतील सर्वात मोठा नवरात्र उत्सव दुर्गाडी किल्ल्यावर साजरा करण्यात येतो. 
मात्र या ठिकाणी देखील शासनाने घालून दिलेल्या कोरोंना नियमांचे पालन करण्यात येणार आहे. ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहे त्यांना दर्शनासाठी १० - १० च्या गटाने सोडण्यात येणार आहे. तर ज्या भाविकांना गाभाऱ्यांत प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेता येणार नाही त्यांच्यासाठी गडाच्या पायथ्याशी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असाल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले.   

शासनाच्या आदेशानुसार ७ ऑक्टोंबर घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात येणार आसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोंनाचे सावट असल्याने गेली दीड वर्षापासून मंदिरे बंदच होती. 
शासनाने दिलेल्या निर्णयानुसार मंदिरे उघडणार असल्याने अखेर भाविकांची प्रतीक्षा संपणार आहे. नवरात्री म्हंटल तर गरबा आणि दांडिया रास येतोच. मात्र गत वर्षीप्रणमणेच यंदाच्या वर्षी देखील गरबा आणि दंडियारास बंदच राहणार असल्याने गरबा रसिकांचा हिरमोड झाला आहे. 

Post a Comment

0 Comments