स्वतंत्र भारतातील जनरल डायरच्या निषेधार्थ सर्व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हा- आनंद परांजपे


■राष्ट्रवादीने लावले शहरभर होर्डींग्ज अन्नदात्याच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार....


ठाणे (प्रतिनिधी) -  उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकर्‍यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान,  “भाजपचे मंत्री हे स्वातंत्र्यपूर्व काळातील जनरल डायरसारखे वागत आहेत.             त्यामुळे या जनरल डायरचा निषेध करण्यासाठी शिवसेना नेते तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली  बंद पुकारण्यात आला आहे. सर्व ठाणेकर नागरिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,” असे आवााहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक मा. खा. आनंद परांजपे यांनी केले आहे.               केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमा निमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे.  या  घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे.  या बंदनिमित्त राष्ट्रवादीने शहरभर होर्डींग्ज लावले आहेत.            दरम्यान,  हा बंद राजकीय नसून अन्नदात्याला म्हणजेच शेतकर्‍याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. ज्या शेतकर्‍याच्या घामातून आपल्याला दोन घास मिळतात; त्याच शेतकर्‍याचे रक्त सांडण्याचे पाप हे भाजप सरकार करीत आहे. दिल्लीच्याा सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर लाठीचार्ज करणारे, अश्रूधूर सोडणारे हे केंद्र सरकार जनरल डायरची सुधारीत आवृत्ती आहे. जनरल डायरने स्वातंत्र्याची मागणी करणार्‍यांवर जालियनवाला बागेत बेछूट गोळीबार केला होता.            अगदी त्याच पद्धतीने केंद्र सरकारमधील मंत्री हक्क-अधिकार मागणार्‍या शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडत असतील तर उद्यमसिंग होऊन त्यांचा सामना करायला आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते सज्ज आहेत. ही जुलमी राजवट उलथून लावण्यासाठी आता जनतेने सज्ज झाले पाहिजे. त्यासाठी आता सामान्य नागरिकांनीही बंदमध्ये शांततापूर्ण मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments