कोरोंनाचे संकट दुरकरण्यासाठी तृतीय पंथियांचे देवीकडे साकडे १४ वर्षापासून करत आहेत देवीची उपासना
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  गेल्या १४ वर्षापासून कल्याण पूर्वेतील काचोरेगाव येथील नवी गोविंदवाडी मध्ये तृतीयपंतीयांकडून दुर्गा देवीची मनोभावे पूजा अर्चना करण्यात येत आहे. गेली दीड वर्ष कोरोंनामुळे सर्वाना त्रास सहन करावा लागल्याने ही कोरोंनाचे संकट लवकर दूर अशी प्रार्थना यावेळी त्यांनी दुर्गा देवीकडे केली आहे.कचोरे गावातील नवी गोविंदवाडी परीसारतील तृतीयपंथी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करून दररोज मनोभावे पूजा अर्चना करत आहेत. येथे दररोज आरती केली जाते आणि विशेष महणजे सर्व तृतीयपंथीयांनी नावरात्रीचे नऊ दिवस उपवास केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आमचा समाज विखुरला असून त्यांना एकत्र आणण्यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे गुरूमा शालिनी यांनी सांगितले. त्याचबरोब या कोरोंनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना आम्ही सर्व देवीकडे करत असल्याचे चंचल यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments