ताल बारमध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांचा धिंगाणा बार सुरू करण्यासाठी रिव्हॉल्व्हर चा धाक दाखवत घातला गोंधळ पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांचा सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ताल बार मध्ये काल रात्री दहा वाजन्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या  पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍यांचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.



टिटवाला मध्ये राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखर सोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडेमंगल सिंग चौहानरिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. रात्री बार मध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी अजून गाणे सुरू ठेवावा अशी मागणी बार मॅनेजर कडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ आहेतुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच  या ६  जणांनी बार मध्ये धिंगाणा सुरू केला.



जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता. गाणे सुरू करणार नाही तर आम्ही बिल भरणार नाही असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसनची रिवाल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहाजण बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. आज या ६  जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले हे करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments