मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत एस एस टी महाविद्यालयात कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद

   कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : एस एस टी कला आणि वाणिज्य महाविद्यालया तर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड -१९ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. आपण सुरक्षित तर देश सुरक्षितया संकल्पनेवर आधारित 'मिशन युवा स्वास्थ्यअभियाना अंतर्गत हे शिबीर भरवण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. देशभरात शाळा आणि महाविद्यालये सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वयाची १८ वर्षे  पूर्ण असलेल्यामात्र अजून लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरता एस एस टी महाविद्यालयात हि मोहीम पार पडली. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही त्यांना पहिला डोस दिला गेला तर दुसऱ्या डोस साठी पात्र होण्यासाठीचा कालावधी पूर्ण करणाऱ्यांना दुसरा डोस दिला गेला. विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि शिक्षक वर्गासाठीदेखील लस उपलब्ध करून देण्यात आल्या. या अभियानात कोविड -१९ लसीकरणासाठी कोविशील्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन्ही लसी उपलब्ध होत्या. महाविद्यालयाच्या आवारात बुधवारी १५० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याचा फायदा घेतला. ऑनलाईन नोंदणीसाठी महाविद्यालयाने सहकार्य केले.अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात हा उपक्रम राबवला गेला. या प्रसंगी डॉ. अश्विनी कोंडीलकर, डॉ. राहुल वानखेडे यांच्या सोबत आरोग्य सहकारी जे. एन. बोरकर आणि जे .वंजारी यांनी लसीकरणाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल तेलिंगे यांनी केले. तर शिबिराचे नियोजन प्राध्यापक जीवन विचारेप्राध्यापक राहुल अकुलप्राध्यापक दिलीप आहुजा यांनी डी एल एल इराष्ट्रीय सेवा योजना या विभागांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या केले.

Post a Comment

0 Comments