‘हलाल मुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होण्याचे हिंदु जनजागृती समितीचे आवाहन




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भारत सरकारचे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) असतांना हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या इस्लामी संस्थांची भारतात आवश्यकताच काय आहे या हलाल प्रमाणपत्रासाठी प्रथम 21,500 रुपये आणि प्रतिवर्षी नूतनीकरणासाठी 15,000 रुपये घेतले जातात. यातून निर्माण होत असलेली हलालची समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहेत्यासाठीच या वर्षी हिंदूंनी दिवाळीच्या वस्तू खरेदी करतांना ग्राहकाचा हक्क वापरून हलाल प्रमाणित’ उत्पादनेमॅकडोनाल्ड आणि डॉमिनोजचे खाद्यपदार्थ यांच्यावर बहिष्कार घालावा आणि हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी व्हावेअसे आवाहन समितीने केले आहे. समिती आंदोलनेनिवेदन देणेसोशल मिडीया आदी माध्यमांतून जनजागृती करत आहे.



 हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैध आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील हलालची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्य प्रसाधनेऔषधेरुग्णालयेगृहसंस्था अशा अनेक गोष्टींत केली जात आहे. त्यासाठी हलाल इंडियाजमियत उलेमा-ए-हिंद सारख्या इस्लामी संस्थांना शुल्क देऊन त्यांच्याकडून हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले गेले आहे. सेक्युलर भारतात सरकारच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ म्हणजे (FSSAI) कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का भारतात अल्पसंख्य म्हणवणार्‍या मुसलमानांची लोकसंख्या केवळ 15 ते 17 टक्के असतांना उर्वरित बहुसंख्य हिंदूतसेच अन्यधर्मीय यांच्यावर हलाल’ का लादले जात आहे त्यातही मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोज यांसारख्या विदेशी संस्था भारतात सगळ्याच ग्राहकांना हलाल’ खाऊ घालत आहेत.



सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हलाल प्रमाणिकरणाद्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. हे प्रमाणपत्र देणार्‍या संघटनांपैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांधांना सोडवण्यासाठी न्यायालयीन साहाय्य करत आहेत. निधर्मी भारतात अशी धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणेहे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने हलाल प्रमाणिकरण’ पद्धत तात्काळ बंद करावीया मागणीसह हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावाअसे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सत्यविजय नाईक हेही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments