राज्य ज्युदो संघटनेच्या कार्यकारिणीवर डोंबिबलीकर निखिल सुवर्णा आणि आदर्श शेट्टी

 

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डोंबिवली रहिवासी तथा ठाणे जिल्हा ज्यूदो संघटनेचे सचिव निखिल अशोक सुवर्णा यांची विशेष वरिष्ठ सदस्य पदी व सहसचिव पदी आदर्श शेट्टी यांची राज्य तांत्रिक समितीत निवड झाली आहे.


   

            महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप गायकवाड तर भारतीय ज्युदो महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलासं यादव, व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने संघटनेचे सहसचिव दयानंद कुमार यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.



            नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणीत संघटनेच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे ॲड धनंजय भोसले, महासाचिवपदी रत्नागिरीचे शैलेश टिळक व राज्य तांत्रिक समितीअध्यक्ष पदी रवी पाटील  (मुंबई  ) तर सचिव पदी दत्ता आफळे (औरंगाबाद) यांची  उपाध्यक्ष पदी मुंबईचे बिलोमोरिया कावस व वाय.एन.बंगेरा,  पुरुषोत्तम चौधरी ( नागपूर ) व राजकुमार पूनकर ( अमरावती ), सहसचिवपदी  गणेश शेटकर ( बीड), कोषाध्यक्षपदी  रवींद्र मेतकर ( नाशिक ), 



            तर सदस्य पदी सतीश पहाडे अमरावती, अतुल बामनोदकर औरंगाबाद, विकास पाटील सातारा, विश्वास जोशी औरंगाबाद, चंद्रशेखर साखरे (सांगली), प्रविण गडदे (उस्मानाबाद), निलेश गोयथळे (रत्नागिरी), जयंत साखरे (यवतमाळ), प्रविण कोपटीकर (नांदेड), दिनेश बागुल (धुळे), निखिल सुवर्णा (ठाणे ), वीरधवल पाटोळे (कोल्हापूर ) यांची तर विशेष वरिष्ठ सदस्यपदी रत्नाकर पटवर्धन नाशिक, अर्चना  केवाळे अमरावती, शोभना शेटकर बीड यांची नेमणूक झाली आहे.


Post a Comment

0 Comments