Header AD

टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी


■नागरिकांच्या सेवसाठी पुन्हा एकदा वचनबध्द होण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक आहेअसे उद्गार महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात‍ कोविड नियमांचे पालन करुन संपन्न झालेल्या महापालिकेच्या वर्धापन दिन समारोहात महापालिका सचिव संजय जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे उद्गार काढले.         या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या कारर्किदीतील वेगवेगळया घडामोडींची माहिती दिलखुलासपणे प्रेक्षकांसमोर मांडली. कोविडच्या लढाईने एक वेगळीच उर्जा सगळयांना दिलीती वापरुन नागरिकांचे प्रश्न सोडवू यानागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा वचनबध्द होऊ या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाला केले.महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या या छोटेखानी समारंभात कोविड कालावधीत महापालिकेला मदत केलेल्या /करणा-या डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टरांचाआयएमएनिमाधारपाकेम्पसवा या वैदयकीय संघटनांतील अध्यक्षांचाबाज आर आर रुग्णालयाचे डॉ. अमिर कुरेशीनिऑन रुग्णालयातील मिलींद शिंदे हॉलिक्रॉस हॉस्पिटलच्या सिस्टर शिबा यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेला कोविड कालावधीत मदत करणा-या विविध एनजीओकोविडच्या पहिल्या लाटेत अन्नधान्य पुरवठा करणा-या दानशुर व्यक्तीगुरुद्वाराकल्याण पश्चिमसंत गजानन सेवा ट्रस्ट या सारख्या सेवाभावी संस्था यांनादेखील या समयी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.कोविड कालावधीत महापालिकेस सातत्याने सहकार्य करणा-या पोलिस अधिकारी कर्मचारी वर्गाचामहापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये सेवा देणा-या व्यक्तींचाही महापालिका आयुक्त यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी/कर्मचारी वर्गाचा तसेच विविध पत्रकार संघटनांचा देखील प्रतिकात्मक स्वरुपात यावेळी सत्कार करण्यात आला.
 या समारोहास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सपत्नीक उपस्थित होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आई-वडील देखील हा सोहळा पाहण्यासाठी समक्ष उपस्थित होते. तसेच महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टर्सएनजीओजअप्पर पोलिस आयुक्त दत्‍तात्रय कराळेपोलिस उपायुक्त गुंजाळमहापालिकेचा अधिकारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारउपआयुक्त विनय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी स्वत:च्या आवाजात सुमधुर आवाजात गाणी गाऊन तसेच कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी आपल्या एकपात्री अभिनयाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव तथा विभागप्रमुखमाहिती व जनसंपर्क -संजय जाधव दत्तात्रय लदवामहेश देशपांडे यांनी केले.

टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक  - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी Reviewed by News1 Marathi on October 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads