खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

 
डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  होत असल्याच्या घटना घडत आहेत.डोंबिवली शिवसेना शाखाप्रमुख अजय घरत हे मोटरसायकल चालवीत असताना डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळेसमोरील रस्त्यावरील  खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी घडली.               घरत हे  पत्नी , ३ वर्षाचा मुलगा यांना घेऊन मोटरसायकलवर बसून  घरी जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात मोटरसायकल    गेल्याने ते पडून जखमी झाले. यात घरत यांच्या पायाला दुखापत झाली आहे.यावेळी पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहन चालकाला अंदाज न आल्याने त्याचाही गाडीवरील ताबा सुटला.मात्र वाहनचालकाने गाडीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील धोका टळला.घटनास्थळी नागरिकांनी शिवसेना शाखाप्रमुख घरत यांना  सावरकर रोड येथे प्रथमोपचारासाठी नेले होते.
               याबाबत घरत  यांना विचारले असता ते म्हणाले, अजुन किती दिवस पालिका खड्डे भरण्याचे नाटक करणार आहे.टिळक चौक येथे  रस्त्याची  दुरवस्था  झाली आहे.गेल्या वर्षी परदेशी टेक्नॉलॉजी पद्धतीने टिळक चौक ते मंजुनाथ विद्यालय ते पाथरली  पर्यत रस्ता बनवला होता. एका वर्षात रस्त्याला खड्डे पडल्यामुळे जनतेचा कर स्वरूपातील पैसा  खड्यात वाया जात आहे.
               दरम्यान डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत शहरातील रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments