नो पार्किंग मधील पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई

 कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरु आहे. नो पार्किगचा फलक लावून सुद्धा या ठिकाणी गाडय़ा पार्क केल्या जात आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या गाडयांचा समावेश मोठय़ा प्रमाणा असतो. आज कल्याण वाहतूक पोलिसांनी पोलिसांच्याच गाडय़ांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत १०० हुन अधिक पोलिसांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम वाहतूक पोलिस करीत असतात. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिक्षा चालक आणि नो पार्किगमध्ये बेशिस्तपणो उभ्या केलेल्या दुचाकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे नो पार्किगमध्ये उभ्या केलेल्या गाडय़ात पोलिस आणि वकिलांच्या गाडय़ा जास्त असल्याने  या गाडय़ांच्या विरोधात कारवाई करताना पोलिसांसमोर पेच निर्माण होतो. यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात होत्या.कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी या बेशिस्त गाडय़ा पार्किगवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशऩ परिसरात नो पार्किग झोनमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ांच्या विरोधात मोठी कारवाई केली गेली. यामध्ये १०० हून अधिक पोलिसांच्या गाडय़ांच्या विरोधात इ चलानच्या माध्यमातून कारवाई केली आहे. या पूढे गाडय़ा उभ्या करुन अडथळा निर्माण करु नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments