वाहतूक कोंडीस फेरीवाले जबाबदार असल्याचे पालिकेला पत्र नियमा नुसार कारवाई होत नसल्याचा फेरीवाल्यांचा आरोप
डोंबिवली ( शंकर जाधव ) शहरातील वाहतूक कोंडीला फेरीवाले जबाबदार असून पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी अश्या मागणीचे पत्र डोंबिवली वाहतूक नियंत्रण उपशाखेने पालिकेचे `ह` प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांना दिले.परंतु पालिका करत असलेली कारवाई नियमांनुसार नसल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.फेरीवाल्यांवर होणारी कारवाई थांबवावी अशी मागणी केंद्रीय मानवाधिकारी संघठन संस्थेने केला आहे.बुधवारी संस्थेच्या पदाधिकाऱ्या फेरीवाल्यांना सोबत घेऊन पथकप्रमुख विजय भोईर यांना आपल्या मागणीचे पत्र दिले.         मागणी केंद्रीय मानवाधिकारी संघठन ठाणे जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी केंद्रे, अमोल केंद्रे, अभय दुबे यांनी निवेदन दिले.डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील परिसरात बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली. या कारवाईला विरोध करत कारवाई करण्याअगोदर पालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस फेरीवाल्यांन दिली नाही. पंचनामा न करता माल जप्त करण्यात आला.
         पथविक्रेता कायदा २०१४ नुसार फेरीवाल्यांचा  सर्वे झाला आहे अश्या फेरीवाल्यांना पालिकेने प्रमाणपत्र देऊन त्यांना नियमानुसार जागा आखणी करून जागा देणे आवश्यक आहे. मात्र पालिका प्रशासनाने या नियमांची अंमलबजावणी अद्याप केली नाही.जोपर्यत पालिका या नियमाचे पालन करत नाही तोपर्यत कारवाई करू नये असे पत्रात म्हटले आहे.तर वाहतूक कोंडीला फेरीवालेही जबाबदार असून असे पत्र प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments