रामबाग जोशीबाग परिसरात साप आणि घोरपडीचा सुळ सुळाट नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिमेतील रामबाग व जोशिबाग परिसरात मोठ्या प्रमाणात साप व घोरपड निघत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यामध्ये या परिसरात राहणाऱ्या सर्पमित्र सतीश बोबडे यांनी घोरपड पकडला असून एक घोरपड चार फुटाची दुसरी घोरपड दीड फुटाची आहे.          परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घोरपड असल्याची माहिती सतीश बोबडे यांना मिळतात त्यांनी दोन्ही घोरपड पकडून वन विभाग अधिकारी यांच्या स्वाधीन केले आहे. सर्पमित्र सतीश बोबडे यांच्या माहितीनुसार स्टेशन परिसरात असलेल्या पोलीस लाईन मध्ये लोकवस्ती नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून यामध्ये सरपटणारे प्राण्यांची वाढ झाली आहे तेथूनच हे घोरपड व साप लोकवस्तीमध्ये येत आहेत.

Post a Comment

0 Comments