राष्ट्रवादीत युवकांचा प्रवेश... पालिकेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार मोर्चे बांधणी

   डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकडे लक्ष देत विविध पक्षांचे नेतेमंडळी पदाधिकाऱ्यांची भेटी घेत आहेत. दुसरीकडे पालिकेत सत्तेत भागीदार होण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसते. पक्ष बळकटीला युवकांची साथ महत्वाची असल्याने जास्तीत जास्त युवकांना पक्षात आणा या प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार कल्याण ग्रामीण भागात युवकांना प्रवेश देऊन पक्ष आणखी मजबूत बनवण्याकडे लक्ष दिले जात आहे. कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (अप्पा) शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, कल्याण डोंबिवली जिल्हा सचिव अ‍ॅड. ब्रम्हा माळी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण मधील १०० पेक्षा जास्त युवकांनी पक्ष प्रवेश केला.            यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा कार्याध्यक्षपदी वैभव माळी व संतोष जाधव  तर कल्याण ग्रामीण विधानसभा उपाध्यक्षपदी स्वप्नील चौधरी व संदीप भोईर तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा सचिवपदी समीर शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा सुरैया पटेलसरचिटणीस समीर गूधाटेकल्याण ग्रामीण महिला अध्यक्षा उज्वला भोसलेकल्याण पूर्व अध्यक्ष विश्वास आव्हाडयुवक जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभय भुवडबाळाराम चौधरीदिनेश हुलावळेअजिंक्य माळीकेतन पाटीलनिखिल शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. वंडार पाटील म्हणाले,राष्ट्रवादी पक्षात जास्तीत जास्त युवकांना प्रवेश दिला जात आहे.
         आता जनतेलाही माहित पडले आहे कि फक्त राष्ट्रवादी पक्षच विकास करू शकतो.कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले,पालिकेत राष्ट्रवादीचे सत्ते नकीच असेल. हाच पक्ष विकासाची कामे करू शकतो हे युवकांना पटले असून पक्षात जास्तीत जास्त प्रवेश होत आहेत.तर कल्याण डोंबिवली जिल्हा सचिव अ‍ॅड. ब्रम्हा माळी म्हणाले, कल्याण जिल्हा अध्यक्ष जगनाथ ( आप्पा ) शिंदे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, कल्याण-डोंबिवली युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत युवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले होते. पक्षात युवकांना संधी देऊन पुढे आणा. त्यानुसार कल्याण ग्रामीण मध्ये कामे सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments