डोंबिवलीत पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्राची सुरुवात ५० लाख नागरीकांना होणार फायदा
कल्याण , कुणाल  म्हात्रे   डोंबिवलीत पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्राचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री देऊसिंग चौहान यांच्या हस्ते पार पडले. मंत्री चौहान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाची स्तूती केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कामाबाबत बोलताना नाव न घेता विरोधाकांचा समाचार घेतला. व्हीडीओ काढणा:यांनी व्हीडीओ काढावेत आम्ही विकास कामे करु असा टोला त्यांनी लागवला.२०१७ पासून कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे यांनी पोस्ट ऑफीस पास्टपोर्ट केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आज केंद्रीय राज्यमंत्री देऊसिंग चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम पार पडला. डोंबिवलीत उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी खासदार शिंदे प्रमुख पाहुणो होते. पोस्ट खात्याचे मुख्य अधिकारी हरीचंद्र अग्रवालप्रादेशिक पारपत्र अधिकारी डॉ. राजेश गवांडे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंत्री देवूसींग चौहान यांनी खासदार शिंदे यांनी घेतलेल्या मेहनतीची स्तूती केली. डोंबिवली कल्याणउल्हासनगर अंबरनाथ बदलापूर कजर्त परिसरातील ४५ ते ५० लाख लोकांना या पोस्ट ऑफिस पास्टपोर्ट केंद्राचा फायदा होणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments