उत्तर प्रदेशमध्ये सुरु आहे गुंडाराज – सलीम शेख


■कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची तहसीलदार कार्यालयावर धडक...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : उत्तर प्रदेशमध्ये गुंडाराज सुरु असल्याची टीका कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी केली आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेत्तृत्वाखाली कार्यकर्त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी तहसीलदार कार्यलयावर मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देत यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरात एकत्र येत तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गाडी चालवत अत्यंत क्रूरपणे चिरडले आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अटक देखील केली होती. याच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मध्ये गुंडाराज सुरु असून हे सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं कि हे गरिबांचं सरकार आहे मात्र तसे दिसत नाही. कित्येक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना वेळ भेटत नाही पण अमेरिकेला जायला वेळ आहे.लखीमपूर येथे अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाला कठोर शिक्षा करून अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्यावा आणि उत्तर प्रदेश मधील योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळी सलीम शेख यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.  

Post a Comment

0 Comments