कोरोनामुळे नाही तर धुळीपासून संरक्षणासाठी लोकं मास्क वापरतात


■मनसे आमदार राजू पाटील यांची केडीएमसी प्रशासनावर टिका २७ गावांसह डोंबिवली शहराकडे देखील प्रशासनच दुर्लक्ष....


कल्याण,  कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रचंड खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता पाऊस कमी झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली मधील जनता आता कोरोनामुळे नाही तर धुळीमुळे मास्क वापरत असल्याची टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.            कल्याण ग्रामीण भागातील काटई गावातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ राजू पाटील यांच्याहस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीसदस्य गजानन पाटील, नगरसेवक प्रभाकर जाधव, काटईचे माजी उपसरपंच काशिनाथ पाटील, मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, रोहित भोईर, फुलचंद पाटील, विश्वास पाटील, योगेश दराडे, जगदीश पाटील आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.  कल्याण डोंबिवली मधील रस्त्याची हि चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे आणि धुळीमुळे आता अपघात देखील घडू लागले आहेत. मात्र असं असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कल्याण डोंबिवली मध्ये प्रचंड धुळीचे आणि खड्डयांचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे मनसेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना लक्ष केले आहे. २७ गावांसह डोंबिवली शहराकडे यांचे लक्ष नाही. फक्त कल्याणचे आयुक्त म्हणून बसतात तिथे. त्याच्या दिल्ली वाऱ्या वगरे सुरू आहेत. इथे काय परिस्थिती आहे याकडे अजिबात लक्ष नाही. आता पर्यंत खड्डे भरून व्हायला हवे होते.परवा डोंबिवली एमआयडीसीत सेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वादा नंतर तिथले खड्डे भरले. मात्र आता परत धूळ निघाली आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. लोकांनी कोरोनापासून बचावासाठी नाही तर धुळीपासून बचावासाठी मास्क वापरणे सुरू केले असल्याची  टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. मंगळवारी कल्याण ग्रामीण विधानसभा मतरदार संघातील काटई गावात आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधी मधून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Post a Comment

0 Comments