कल्याण मध्ये पार पडली श्री दुर्गामाता दौड

 कल्याण , प्रतिनिधी   :  देव देश धर्माची पुजा करून भारतमातेला तिचे परमवैभव पुन: प्राप्त करून देणारा राष्ट्रीय  उपक्रम म्हणजे श्री दुर्गा माता दौड. हि दौड रविवारी कल्याणमध्ये पार पडली. नवरात्रोत्सवात प्रतिवर्षी तरुणांची भव्य तुकडी हातात भगवा ध्वज घेऊन भल्या पहाटे मंदिरे जागवत राष्ट्रपुरुषांचा आणि देव-देश-धर्माचा जयघोष करत दौडत असतात.           ज्यास श्री दुर्गा माता दौड (राष्ट्रीय नवरात्र) म्हणून संबोधले जाते. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रभर श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित नवरात्रोत्सवात जागोजागी निघणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीतुन देव-देश-धर्मासाठी भल्या पहाटे भगवा ध्वज हातात घेऊन दौडणार्या तरुणांची दौड कल्याण मध्ये पाहायला मिळाली. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी ध्वजपूजन करून स्वहस्ते ध्वज घेऊन दौड केली. हि दौड पहाटे ६ वाजता शनैश्वर मित्र मंडळ, छत्रपती श्री शिवाजी महाराज कॉलनीकोळशेवाडी कल्याण (पूर्व) ते श्री जरी मरी माता मंदिर (तिसगाव) पर्यंत आयोजित होती. राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्यअध्यक्ष राहुल महाजन हे देखील उपस्थित होते. त्याशिवाय दौडीत दौडणार्या नवतरुणांची संख्या मोठी होती. या दौडचे आयोजन गणेश काळेविकी काळेसाहिल गवसअमोल आव्हाडपवन गोसावीअमोल शिंदेदिनेश गायकवाड, ओंकार चास्कर, शुभम ननावरे आदींनी केले होते.

Post a Comment

0 Comments