कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती बाजार समितीच्या आवारात उभारणार कचरा प्रक्रिया प्रकल्प
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या फळ, भाज्या, फुले आणि धान्याची आवक होत असते. यातून सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असतो. महानगरपालिकेने देखील डम्पिंग ग्राउंड बंद केल्याने आता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार असून यातून खत निर्मिती केली जाणार आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लागणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.        कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिका आणि बाजार समिती यांच्यात कचऱ्या उचलण्याच्या वादातून अनेक वेळा याठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. महापालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद केल्याने त्या अनुशंगाने ठराव घेऊन स्वताचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असून या ठरावाला १८ ऑक्टोंबर रोजीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बाजार समितीचं स्वताच कचऱ्या पासून खत निर्मिती प्रकल्प उभा राहणार असल्याचे कचऱ्याचा प्रश्नच राहणार नाही.         कचऱ्याचा जो काही प्रश्न दिसतो तो फुलमार्केट मधील जे गाळे महापालिकेच्या ताब्यात आहेत, ज्यांचं भाडं, टॅक्स  महापलिका घेते, ते त्यांचा कचरा उचलत नाहीत त्यामुळे त्याठिकाणी कचरा दिसत असतो. बाजार समितीचा जो कचरा आहे तो नियमितपणे कंत्राटदारामार्फत उचलला जात आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत अन्नधान्य बाजार, भाजीपाला बाजार, फुल बाजार, बैलबाजार यामधून एकूण ५ टन कचरा निर्माण होतो.          त्यामध्ये पालेभाज्यांचा कचरा उचलण्यासाठी वेगळा ठेकदार नेमला असून पशुखाद्यासाठी हा कचरा उचलला जातो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता नसते. इतर जो कचरा आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ५ टन क्षमता असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु करत असल्याने यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कचऱ्याची समस्या उद्भवणार नसल्याची माहिती सभापती कपिल थळे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments