बेंचप्रेस स्पर्धेत शिवशक्ती क्रीडा मंडळाची चमकदार कामगिरी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : काही दिवसांपूर्वी कळवा येथे झालेल्या ठाणे जिल्हा बेंचप्रेस स्पर्धेत शिवशक्ती क्रीडा मंडळ यांनी ३ विजेतेपद मिळविले. ज्यात सांघिक सिनिअर पुरुष व सांघिक ज्युनियर पुरुष याचबरोबर नवीन कदम यांनी सर्वाधिक ४ सुवर्णपदक मिळवून स्ट्रॉंग मॅन ऑफ ठाणे जिल्हा (सिनिअर / ज्युनियर) या पदावर आपली मोहोर उमटवली.          त्याच खालोखाल कमलेश नाट व कुंदन माने यांनी प्रत्येकी २ सुवर्ण१ रौप्य व १ कांस्यअंकिता पोखरे व  धनिष्ठा धरमशी यांनी प्रत्येकी २ सुवर्णपदकअभिषेक पाटणकर याने १ सुवर्ण१ रौप्य२ कांस्यपदकअमोल कडूस्कर व वरून कदम यांनी प्रत्येकी १ सुवर्ण व १ रौप्यपदकसुनील शर्मा व चंद्रशेखर पुजारी यांनी १ सुवर्णतेजस जामगांवकर १ रौप्य व चैतन्य मोघे यांनी २ कांस्यपदकांची कमाई केली.यातील काही खेळाडूंची निवड औरंगाबाद येथे भरविलेल्या महाराष्ट्र राज्य बेंचप्रेस स्पर्धेत झाली. ज्यात कमलेश नाट यांना ७४ किलो वजनी गटात ज्युनिअर क्लासिक मध्ये सुवर्ण व ज्युनिअर इक्यूपाय मध्ये रौप्यतेजस जामगांवकर ८३ किलो सबज्युनिअरसाठी कांस्यप्रियांका दळवी ज्युनिअर व सिनिअर क्लासिक मध्ये रौप्य (२) ज्युनिअर व सिनिअर इक्यूपाय मध्ये सुवर्ण (२)अंकिता पोखरे सिनिअर ६३ किलो गटात सुवर्णधनिष्ठा धरमशी ज्युनिअर ७६ किलो गटात कांस्यकुंदन माने मास्टर-१ १२० किलो गटात क्लासिकमध्ये रौप्य व इक्यूपायमध्ये सुवर्णपदक तर नवीन कदम यांनी ८३ किलो वजनी गटात ज्युनिअर / सिनिअरमध्ये सुवर्णपदक मिळवीत ज्युनिअर स्टँगमॅन ऑफ महाराष्ट्रचा मानकरी ठरला.या खेळाडूंची निवड गोवा येथे दि.  १६ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झाली आहे. या सर्व खेळाडूंना सरावासाठी लागणारी जागा माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी उपलब्ध करून देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले.

Post a Comment

0 Comments