शिवा ठाकूर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 ठाणे (प्रतिनिधी)  -  राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत भाजपचे युवा कार्यकर्ते शिवा ठाकूर आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, नवी मुंबईचे युवाध्यक्ष अन्नु आंग्रे  यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.             शिवा ठाकूर हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये सक्रीय होते. भाजपची युवा आघाडीमधील ते सक्रीय कार्यकर्ते होते.  आज शिवाजी कल्याण ठाकूर, गणेश पवार,प्रशांत खोपडे,संजय जती,सुरज गुप्ता,सुनील गावडे या प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे दीडशे जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवारसाहेब यांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी आज डॉ. आव्हाड यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला.             यावेळी डॉ. आव्हाड म्हणाले की, सर्वांना परिवर्तनाची अपेक्षा आहे. लोकांची कामे होत आहेत. लोकांना राष्ट्रवादीवर विश्वास आहे. आपले भविष्य कोणाच्या हाती सुरक्षित आहेत, हे युवकांना समजत आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. युवकांची ही ऊर्जा नक्कीच परिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments