डोंबिवलीतील बेशिस्त रिक्षा चालकांकडून १ लाख रुपये दंड वसूल
डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण  प्रादेशिक परिवहन विभाग  व डोंबिवली वाहतूक विभाग  यांनी डोंबिवली शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये एकूण ८० रिक्षाचालकावर दांडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण  सुमारे एक लाख तेरा  हजार रुपये  दंड आकारण्यात  आला आहे.तसेच दोन रिक्षा जमा करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.
           डोंबिवलीत शहरात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांमध्ये सर्वात जास्त रिक्षा असल्याचे दिसते.वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाईचा बडगा उगारला आहे.तर मोटरसायकलस्वारही वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे दिसते.तर अजूनही चारचाकी वाहने काळी फिल्म वापरत असून यात जास्तीत जास्त राजकीय नेतेमंडळीच्या चारचाकी आहेत.
          नियम सर्वाना समान असून आता अश्या चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करतील का त्याकडे कानाडोळा करतील हे लवकरच दिसून येईल.

Post a Comment

0 Comments