मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन - प्रा.देविदास मुळे


■सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे वाचन प्रेरणा दिन साजरा....


कल्याण, कुणाल म्हात्रे  : मन आणि बुद्धी सुदृढ करण्यासाठी केलेली मशागत म्हणजे वाचन अशी सुंदर आणि छोटीशी व्याख्या सांगून प्रमुख पाहुणे प्रा.देविदास मुळे यांनी वाचन करत असलेल्यांना आणि वाचन करण्यासाठी सगळ्या वाचकांना समृद्ध केले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती म्हणजेच वाचन प्रेरणा दिन सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे हा दिवस साजरा करण्यात आला.वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सांगायची गोष्ट अशी की ग्रंथसखा च्या शाम जोशी यांनी प्रकाशित केलेला सुप्रसिद्ध लेखकसमीक्षक डॉ. स. ग. मालसे यांच्या प्रस्तावनांचा खंड हा अनेक अर्थाने मराठी साहित्यवाचन संस्कृती आणि प्रकाशन क्षेत्रातील महत्वाचं पाऊल आहे असे प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केले. तसेच वाचक अनुभूती मैफिल चे प्रसाद सोमण, मृणाल जोशी, मानसी मुजुमदार, शामल ब-हाटे, नीलिमा गवई, लीना लाकडे, ज्योती विश्वास, प्रणिता चितापूरकर, अर्चना वाईकर, अचला डोंगरे, जयश्री बिडगर, मृणालिनी जोशी या सर्व वाचनालयाच्या वाचकांनी द.मा. मिरासदार, वि.आ.बुवा अशोक समेळ यांच्या मी अश्वत्थामा चिरंजीव चे काही अंश यांचं अभिवाचन करून उपस्थितांत वाचन प्रेरणा जागृत केली. प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णीसरचिटणीस भिकू बारस्करचिटणीस आशा जोशीकार्यकारिणी सदस्य अरुण देशपांडेअरविंद शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.      

Post a Comment

0 Comments