मागील पाच वर्षांत दिव्याचा पाणी प्रश्न सोडवण्यास माजी उपमहापौर अपयशी ठरले - रोहिदास मुंडे
ठाणे, दिवा , प्रतिनिधी   : -  दिव्यातील लोकांना पाणी प्यायला नाही आणि पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पाण्याच्या लाईन तोडत आहेत.आधी लोकांना पाणी द्या आणि मग लोकांच्या पाण्याच्या लाईन तोडा.पाणीच नाही तर येथील नागरिक करणार काय?असा संतप्त सवाल भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला आहे.          दिव्यातील जनतेला पुरेसे पाणी मिळत नसल्याने जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे.माझी आयुक्तांना विनंती आहे आधी लोकांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्या मग त्यांच्या जुन्या लाईनवर कारवाई करा!दिव्यातील सत्ताधारी लोकं त्यांच्या मर्जीतील ठराविक लोकांना पाणी उपलब्ध करून देतात त्यांच्या लाईन तोडल्या जात नाहीत मात्र गरीब जनतेच्या पाणी लाईन तोडल्या जात आहेत हे गंभीर आहे असे मुंडे यांनी म्हटले आहे.            रमाकांत मढवी मागील पाच वर्षांत येथील पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत  जेव्हा पासून ते नगरसेवक पदावर आले आहेत पाणी प्रश्न पुन्हा सुरू झाला आहे.पाणी समस्या सोडवण्यासाठी माजी उपमहापौर मढवी हे अपयशी ठरले आहेत असा आरोप ही मुंडे यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments