डोंबिवली रिपाईच्या वतीने धम्म चक्रपरिवर्तन दिन उत्साहात साजरा

डोंबिवली ( शंकर जाधव )  रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया च्या वतीने  डोंबिवली येथे धम्मचक्रपरिवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.डोंबिवली येथील रामनगर संपर्क कार्यालयात रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन डोंबिवलीतील आंबेडकरी समाज आणि इतरांना शुभेच्छा दिल्या.
           जगाला बुध्द धम्म तारु शकतो.असे आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले. डोंबिवलीत इंदिरा नगर, डोंबिवली पश्चिमेला तसेच अनेक ठिकाणी भेट देउन नागरिकांना अध्यक्ष  गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत शहर सचिव दिनेश साळवे, सहसचिव समाधान तायडे, उपाध्यक्ष अँड.सुभाष अंबुरे, संघटक डॉ. संदिप पाईकराव,   संपर्क प्रमुख धम्मपाल सरकटे, वार्ड अध्यक्ष तेजस जोंधळे, मंगेश कांबळे, चंद्रकांत वाढवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments