पोलिस उपायुक्तांच्या शासकीय निवासस्थानाची दुरावस्था बांधकाम विभागाचे शासकीय निवास स्थानां - कडे दुर्लक्ष
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांसाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवास्थानाकरिता देण्यात आलेल्या  सिंहगड बंगल्याची गेल्या दोन ते तीन वर्षापासून दुर्लक्ष करून डागडुगी न केल्याने बंगल्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे.कल्याणचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारीत येत असलेल्या सिंडीकेट येथील सिंहगड हा पोलिस उपायुक्तां निवासस्थानाचा बंगला किमान चाळीस वर्षापासून अस्तित्वात असून पोलिस उपायुक्त बंगल्याचा परिसर शोभनीय असल्याने आपल्या कुटुंबीयांसमवेत या बंगल्यात नियुक्ती झालेले अधिकारी राहून गेले आहेत. चार वर्षापुर्वी उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे तत्कालीन उपायुक्त संजय शिंदे या शासकीय बंगल्यात राहात होते. त्यांची बदली झाल्याने त्यांच्या बदल्यात विवेक पानसरे यांनी परिमंडळ तीन मध्ये नियुक्ती झाली. मात्र त्यांनी या बंगल्यात न राहण्याचा निर्णय घेतल्याने तेथूनच या बंगल्याला पडझडीचे दिवस सुरू झाले. या बंगल्यात विविध स्वरूपाची रचनेची विल्हेवाट लागली असून झाडाझुडपांनी संपूर्ण परिसराला व्यापून टाकले आहे.उपायुक्त पदांचा चार्ज घेण्यापूर्वी निवासस्थानाची पहिली सोय बघितली जात असून भाड्याने मिळालेल्या एखाद्या सदनिकेमध्ये या पोलिस उपायुक्तांना वास्तव करणे भाग पडू लागले आहे. उपआयुक्तांसाठी उपयुक्त ठरला गेलेला सिंहगड हा शासकीय बंगला वापराविना पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे या बंगल्याची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. निवासासाठी शासकीय बंगला असतानाही पोलिस उपायुक्तांना मात्र स्वतंत्र भाड्याने राहावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दरम्यान कल्याण न्यायालयातील आवारात मॅजिस्ट्रेट यांना राहण्यासाठी शासनाने सहा निवासस्थान बांधले होते. मात्र त्यांची अवस्था गंभीर झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी त्यांची तोडफोड केली असून मॅजिस्ट्रेट देखील रेंट वर राहात असल्याची माहिती उपलब्ध झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेले १८८ पोलीस क्वारटर्स तसेच १३ बिल्डिंग या पूर्ण मोडकळीस आल्या असून त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था जीव मुठीत धरून राहण्याजोगी झाली आहे.याबाबत कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांच्याशी संपर्क साधला असता, पोलीस वसाहत आणि उपायुक्तांचे निवासस्थानाच्या दुरुस्ती बाबत प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले.  

Post a Comment

0 Comments