कल्याण पूर्वेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत, 'ई-श्रम कार्ड नोंदणी' उपक्रमास सुरवात
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्व येथेआमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून  रविवारी 'ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी' उपक्रमाला सुरुवात झाली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीई - श्रम कार्ड नोंदणी होणार आहे. ह्या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांचा विमाआपत्कालीन परिस्थितीतकेंद्र शासनाकडून मिळणारा विशेष निधीव विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.           आत्मनिर्भर भारत कोंकण विभाग संयोजक विनय सावंत यांनी प्रमुख वक्ता म्हणूनविविध आत्मनिर्भर भारत योजनांची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. यावेळी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाडजिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशीकोकण विभाग संयोजक विनय सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई, नगरसेवक विक्रम तरे, विजय उपाध्यायआत्मनिर्भर भारत कोकण विभाग सहसंयोजक राखी बारोड, माजी परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, संदीप तांबे, नितेश म्हात्रे आदी जण उपस्थित होते.केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मोफत श्रमिक लेबर कार्ड शिबिराचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लेबर कार्डच्या माध्यमातून सर्व असंघटित कामगारांसाठी केंद्र शासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. या केंद्र सरकारचे श्रमिक लेबर कार्ड मिळणार असून या कार्डच्या माध्यमातून शासनाची मदत ही प्रत्येक्षात सर्वसामान्याच्या खात्यात पोचणार आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीच्या पैशातून होणारा गैरवापरावर आला बसणार आहे. तर ही मदतीची रक्कम दरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहचणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्यांना जगण्यासाठी मोठा आधार मिळणार असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असून सरकार कडून अशा कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होणार असून त्या धोरणांचा फायदा भविष्यात कामगारांना मिळणार आहे. असंघटीत कामगारांना सरकारकडून १ वर्षांसाठी एक अपघाती विमा दिला जाणार असून ईश्रम नोंदणीनंतर १ वर्षासाठी पीएमएसबीवाय योजनेचा लाभ देखील अशा कामगारांना घेता येणार आहे.

Post a Comment

0 Comments