Header AD

एमजी मोटर इंडियाने ९.७८ लाख रु. च्या प्रारंभिक किंमतीत ‘अॅस्टर’ लॉन्च केली


■भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट कार ~

बुकिंग २१ ऑक्टोबर २०२१पासून सुरू.

 


मुंबई, ११ ऑक्टोबर २०२१  :  एमजी मोटर इंडियाने भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही एमजी अॅस्टर ९.७८ रु. च्या खास प्रारंभिक किंमतीत लॉन्च केली आहे.

 


     

      अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि डिझाइन एक्सलन्ससह अॅस्टर ही प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेग्मेंटमधली गाडी आहे. ग्राहक स्टाइलपासून ते सुपर, स्मार्ट आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या शार्प पर्यंतच्या व्हेरियन्टमधून आपल्या आवडीचे वाहन निवडू शकतात.

 



        एमजी अॅस्टर एका स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये येते, ज्याच्यात तीन वर्षे/अमर्याद किलोमीटर्स, तीन वर्ष रोडसाइड असिस्टन्स आणि तीन लेबर फ्री पिरीयॉडिक सर्व्हिस सामील आहेत. अनोख्या माय एमजी शील्ड प्रोग्रामसह अॅस्टर ग्राहकांना वॉरंटी एक्स्टेंशन आणि प्रोटेक्ट प्लानसह आपले ओनारशिप पॅकेज निवडण्याची आणि पर्सनलाईझ करण्याची मुभा मिळते.

 




        अॅस्टरचा ओनरशिप खर्च फक्त ४७ पैसे प्रती किलोमीटर आहे, ज्याची गणना एक लाख किमी. पर्यंत करण्यात येते. या सेग्मेंटमध्ये पहिल्यांदाच अॅस्टरमध्ये ३-६० प्रोग्राम आहे. हा एक अशुअर्ड बाय बॅक प्लान आहे, ज्याच्या अंतर्गत खरेदीनंतर तीन वर्षांनी ग्राहकांना अॅस्टरच्या एक्स-शोरूम किंमतीच्या ६० टक्के मिळू शकतात. हा प्रोग्राम लागू करण्यासाठी एमजी इंडियाने कारदेखोशी भागीदारी केली आहे. अॅस्टर ग्राहक त्याचा स्वतंत्रपणे लाभ घेऊ शकतात.

 



       एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले, “अॅस्टर ही गाडी एमजी ब्रॅंडचा स्थापित वारसा पुढे नेत भविष्यातील मोबिलिटीस सम्मोहक बनवते आणि सोबत त्यात व्यक्तिमत्व, व्यावहारिकता आणि टेक्नॉलॉजी आणते. अनेक फीचर्सनी समृद्ध आणि या सेग्मेंटमध्ये आधी न दिसलेल्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज ही एसयूव्ही या सेग्मेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेल. या कारचे स्थान उत्तम आहे आणि किंमत देखील आकर्षक आहे. माय एमजी शील्ड ग्राहकांना संपूर्ण मनःशांती प्रदान करते आणि प्रत्येक वेळी रोमांचक अनुभव देण्याच्या आमच्या तत्वज्ञानास ते अनुरूप आहे.”

 



      एमजीच्या इमोशनल डायनॅमिझमच्या ग्लोबल डिझाइन फिलॉसॉफीअनुसार अॅस्टरचे स्टायलिंग करण्यात आले आहे. स्मार्ट आणि शार्प व्हेरियन्टसाठी अॅस्टरच्या आय-स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये ८०+ कनेक्टेड कार फीचर्स आहेत. ऑटोनॉमस लेव्हल २ फीचर्सवाल्या एडीएएस २२० टर्बो एटीमध्ये पर्यायी पॅकच्या बरोबर शार्प व्हेरियन्टसाठी व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल.

 



       ग्राहक आजपासून एमजीच्या विस्तृत नेटवर्क किंवा वेबसाइट (www.mgmotor.co.in) वर जाऊन अॅस्टरची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतात आणि प्री-रिझर्व करू शकतात. बुकिंग २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल आणि डिलिव्हरी नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू होईल.


Attached are the collaterals and b-roll: https://we.tl/t-Y4JtJYq2D4

एमजी मोटर इंडियाने ९.७८ लाख रु. च्या प्रारंभिक किंमतीत ‘अॅस्टर’ लॉन्च केली एमजी मोटर इंडियाने ९.७८ लाख रु. च्या प्रारंभिक किंमतीत ‘अॅस्टर’ लॉन्च केली Reviewed by News1 Marathi on October 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads