कल्याण परिसर कोळी समाजाच्या वतीने माजी आमदार कांती कोळी यांना श्रद्धांजली
कल्याण , प्रतिनिधी  :  माजी आमदार, अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र  अध्यक्ष,  अखिल भारतीय कोळी समाज दिल्ली कार्यकारिणी उपाध्यक्ष व कोळी समाजाचे लोकप्रिय नेते कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. 


             त्यांच्या जाण्याने एका क्रांतीसूर्याचा अस्त झाला असून  देशभरातील कोळी समाजाला संघटित करून समाजाच्या अनेक समस्यांची सोडवणूक करणाऱ्या या थोर नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी कल्याण परिसर कोळी समाजाचे  अध्यक्ष नारायण पाटील व पदाधिकारी यांच्या वतीने कै.गजानन हिरु पाटील विद्यामंदिरअटाळी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.      हि सभा अखिल भारतीय कोळी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेव बुवा शहाबाजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अनेक मान्यवरांनी कांती कोळी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कार्याचा गौरव केला.  या सभेस कल्याण वारकरी संप्रदायचे  अध्यक्ष माधव महाराज केशवकल्याण परिसर कोळी समाज अध्यक्ष नारायण पाटीलकल्याण परिसर कोळी समाज सचिव अविनाश भोईरठाणे जिल्हा कोळी समाज सरचिटणीस मारुती पाटील,  डॉक्टर हरिद्वार पाटील आदीसह जवळपास १५० ते २००  समाज बांधव उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रवक्ते मारुती पाटील व प्राचार्य गणेश पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments