हिमालयातील दुर्घटनेतील दोन डोंबिवलीकरांचा शोध सुरू
डोंबिवली ( शंकर जाधव ) २३ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेश येथील किन्नोर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात तिघे जण बेपत्ता झाले. ट्रेकिंगसाठी त्याठिकाणी गेलेले तिघे जण बर्फात गाडले गेले असून इतर १४ जणांना रेस्क्यू करण्यात यश आले आहे. 


         हिमाचल प्रदेशाल किन्नोर परिसरात पडलेल्या मोठ्या हिमवर्षावात ट्रेकिंगसाठी गेलेले तिघे जण बर्फाखाली बेपत्ता झाले. या तिघांमध्ये दोन डोंबिवलीकरांचा समावेश आहे. ६७ वर्षीय राजेंद्र पाठक आणि ६६ वर्षीय अशोक भालेराव अशी त्यांची नावे आहेत. दोघे डोंबिवलीचे रहिवासी असून बालमित्र आहेत. यश दोघांनाही ट्रेकिंगची आवड आहे.


        वयाची साठी ओलांडल्यानंतर देखील ट्रेकिंगची आवड त्यांनी जोपासली होती. जवळपास ४० वर्ष दोघे एकत्र ट्रेकिंग करत होते. मात्र हा हिमालयातील ट्रेक त्या दोघांच्या आयुष्यातील धक्कादायक ट्रेक ठरला. मागील तीन दिवसापासून कुटुंबीयांच्या त्यांच्याकडे नजरा लागल्या आहेत.

Post a Comment

0 Comments