Header AD

डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे महान प्रणेते - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
बडोदा दि. 11 : -  भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे महान प्रणेते होते. प्रज्ञासूर्य म्हणून संपूर्ण विश्वाला  मानवतेची समतेची बंधुत्वाची विज्ञानाची आणि ज्ञानाची प्रेरणा देत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्यातील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि विचारांचा आदर्श घ्यावा. प्रेरणा घ्यावी. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

 


        महाविद्यालयांमध्ये निवडणुकीची पद्धत होती. त्यातून संसदीय  लोकशाहीचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हायचे. आता महाविद्यालयांमध्ये निवडणूक पद्धत बंद झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या  यासंविधानाचा आणि त्यातील लोकशाही मूल्यांचा अभ्यास करावा त्यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसित होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी बडोदा येथे व्यक्त केला.            आपले जीवन स्वतःसाठी जगण्याबरोबरच समाजासाठी ही आपल्या जीवनातील काही भाग खर्च केला पाहिजे. नेतृत्व करायचे असेल तर  स्वार्था पलीकडे जाऊन  समाजाचा ; देशाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रनिर्माते   महापुरूष राष्ट्रपुरुषांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. आताच्या राजकीय परिस्थितीत आजच्या नेत्यांकडून नेतृत्व गुण शिकताना विद्यार्थ्यांनी            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. मोदींनी आपले जीवन पूर्णपणे देशासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे नेतृत्व कसे करावे हे शिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून शिकावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.          विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजे. असेही आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले. बडोदा येथील पारूल युनिव्हर्सिटी मध्ये स्कुल ऑफ लीडरशिप अंतर्गत लोकशाहीत युवकांचा सहभाग या विषयावर ना. रामदास आठवले यांचा विद्यार्थ्यांशी संवाद आयोजित केला होता.           त्यात ना रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी पारुल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु पारुल पटेल  ;डॉ हितेंद्र पटेल; तसेच छात्रभारती चे अध्यक्ष कुणाल शर्मा;  बडोदा मनपा  स्थायी समिती अध्यक्ष जे बी पटेल ; रिपाइं चे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोक भट्टी; प्रभारी जतीन भुट्टा; लीलावतीबेन वाघेला; राजेश कुमार गोयल; तृष्णा व्यास;राजू तायडे;  उपस्थित होते.


          

             पारुल युनिव्हर्सिटी ला  केंद्र सरकार च्या मंत्रलयातर्फे आपण मदत करू; गरीब विद्यार्थ्यांना पायल युनिव्हर्सिटी ने मदत करावी; विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रशिक्षणासाठी स्कुल ऑफ लिडरशीप ही संकल्पना चांगली असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

             

डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे महान प्रणेते - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे महान प्रणेते  - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on October 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads