कल्याण पूर्वेत नाका कामगारांचे लसीकरण सहयोग सामाजिक संस्थेचा पुढाकार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  समाजातील श्रमिक घटक म्हणून काम करीत असलेल्या असंघटीत क्षेत्रातील नाका कामगाराचे कोरोना पासून संरक्षण व्हावे या उद्देशाने कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या कोळसेवाडी येथील नागरी सुविधा केंद्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यासाठी सहयोग सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला होता.या विशेष लसिकरण मोहीमेला कल्याण पूर्वेतील सहयोग सामाजिक संस्थेने नाका कामगारांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती . त्यानुसार कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकतिसगांव नाका तसेच सुचक नाका - टाटा पॉवर हाउस येथील नाका कामगारांचे लसीकरण करण्यात येत असून. या लसीकरण केंद्रावर नाका कामगार आणण्यासाठी संस्थेच्या वतीने तीन रिक्षा तैनात करण्यात आल्या असून लस लाभार्थिंना अल्पोपहार ही देण्यात येत असल्याचे विजय भोसले यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments